३१ जानेवारीला संगीत सभेचे आयोजन

कळसुलकर स्कुल येथे केशवसुत कट्टा यांचे आयोजन

सावंतवाडी ता 27: केशवसुत कट्टा यांच्यावतीने सलग 17 व्या वर्षी ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ सोमवार दि 31 जानेवारी रोजी संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही संगीत सभा येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल सभागृहात सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत होणार आहे.

श्री. निलेश मेस्त्री, सावंतवाडी यांचे सोलो हार्मोनियम वादन तसेच सौ. समीक्षा भोबे-काकोडकर, गोवा यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे त्यांना हार्मोनियम साथ श्री. निलेश मेस्त्री व तबला साथ किशोर सावंत व नीरज भोसले, सावंतवाडी यांची असनार आहे सूत्रसंचालन संजय कात्रे, माणगांव हे करणार आहेत. या कार्यक्रमास संगीत प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत घाटे मित्रमंडळ व केशवसुत कट्टा सावंतवाडी यांच्याकडुन करण्यात आले आहे तर हा कार्यक्रम कोविड- १९ च्या शासकीय सूचनांचे पालन करून होणार आहे

You cannot copy content of this page