देवगड ता.२७-: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शेठ म.ग.हायस्कूल,देवगड मधील इयत्ता ५ वी मधून ६ विद्यार्थी व इयत्ता ८ वी मधून २ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता ५ वी मधून कु.राज्ञी विवेक कुळकर्णी कु. दीक्षा विवेक मेस्त्री कु.दिया गणेश गावकर कु. आर्या रवींद्र शेलार कु. सुयोग संजय कडू कु. मित प्रसाद कुलकर्णी तर इयत्ता ८ वी मधून कु. राजसी इंद्रनील ठाकूर व कु. कांचन उल्हास कदम या सर्वांचा पालक शिक्षक संघाच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सन्माननीय मिलिंद कुबल सौ.डॉ. अर्चना नेने मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक तानाजी पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. फोटो शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी व शिक्षक
