Headlines

राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

सावंतवाडी, ता. ३० : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा कोकणचा वर्धापन दिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी दिपाली गोटे, समाजसेविका सौ. नानी कशाळीकर, केतन सावंत आणि डॉ. मनेश नाईक उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले यांनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या कार्याचे कौतुक करत संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ तथा उपजिल्हा रुग्णालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे शालेय वह्या, छत्र्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकणचे अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, खजिनदार नंदा सावंत, सहसचिव प्रकाश वाघ, सहसचिव शाम माजगावकर, उपाध्यक्ष संतोष दळवी, उपाध्यक्ष सदानंद पावले, प्रशांत कदम, सुरेश दामले, वामन बिर्जे, शेजल आळवे, रंजना आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

You cannot copy content of this page