कट्टा येथील शिवसेनेच्या महिला मेळाव्यालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण दि प्रतिनिधी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मालवण कट्टा येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्याचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप्रज्वलन व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. माणगाव प्रमाणे या महिला मेळाव्याला देखील कट्टा पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. मेळाव्यामध्ये महिलांसाठी पैठणी स्पर्धा घेण्यात आली. तसेच हळदी कुंकू…
