राजू मसुरकर यांचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना निवेदन
सावंतवाडी,ता.१२-:* आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना भक्कम आधार मिळण्याच्या दृष्टीने घरपट्टीमध्ये शिक्षण आणि वृक्ष कराबरोबरच विमा करही आकारण्यात यावा आणि त्या माध्यमातून संबधित शेतकरी किंवा अन्य मालमत्तादारांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याना विम्याचे संरक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी गृहराज्यमंत्री तथा कॉंग्रेसचे जिल्हासंपर्क प्रमुख सतेज उर्फ बंटी पाटील यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अशा प्रकारे घरपट्टीच्या करात ही रक्कम आकारण्यात आल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना नैसर्गिक आपत्ती किंवा अडचणीच्या वेळी होवू शकतो. तात्काळ त्यांना नुकसानीची रक्कम परत मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
