मनसे पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : बिबवणे येथील मनसे शाखेच्यावतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. तत्पूर्वी भारतरत्न गायिका लतादीदी मंगेशकर व लोकराजा सुधीर कलिंगण यांना मनसेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी तालुकाध्यक्ष व पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, माणगाव विभाग अध्यक्ष सचिन ठाकुर, विभाग अध्यक्ष श्रीपाद अडसुळे, धुरीटेंब शाखाध्यक्ष वैभव धुरी, गजानन राऊळ उपस्थित होते. दीपक गावडे यांनी सर्व सहभागी संघांना व मंडळाला शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी बाबल गावडे (प्रथम क्रमांक) व दीपक गावडे (द्वितीय क्रमांक) यांनी पुरस्कृत केले.

You cannot copy content of this page