कणकवली ता.१२-:* श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी असलदे नूतन कार्यकारी संचालक मंडळ थेट सभासद, नागरिकांच्या संपर्कात जाणार आहे.चेअरमन भगवान लोके यांच्या संकल्पनेतून ‘चेअरमन आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ बँक अध्यक्ष मनीष दळवी,तहसीलदार आर.
जे.पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी चेअरमन प्रकाश परब,सरपंच पंढरी वायगणकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,पोलीस पाटील श्रीमती पाताडे व गावातील सर्व मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी,संस्थेचे आजी माजी संचालक व शेतकरी सभासद आदी उपस्थित राहणार आहेत. असलदे या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थर उंचावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.शेतकरी सभासदाना संस्थेच्या विविध कर्ज योजना, नव्याने सभासद नोंदणी,सभासदांना आपल्या संस्थेकडे असलेल्या शेअर्सची माहिती याबद्दलची स्वतः संचालक मंडळ संवाद साधणार आहे.असलदे ग्रामपंचायत सभागृहात शुभारंभ कार्यक्रम होईल,तरी गावातील नागरिकांनी,संस्था सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन चेअरमन भगवान लोके, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
