टियानमध्ये अडकलेल्या कासवाची सुखरूप सुटका

मालवण ता.१२-:* देवबाग येथे समुद्रकिनारी मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या टियान मध्ये अडकलेल्या आँलिव्ह रिडले जातीच्या कासवाची कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने सुटका करत त्याला जीवदान दिले. सुटका केलेल्या या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

देवबाग मधील विठ्ठल मंदिर येथील मच्छीमार रोमी ब्रिटो, हे आपल्या सहकाऱ्यानंसोबत शुक्रवारी रात्री समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना त्यांना एक कासव त्यांच्या मच्छीमारी टियानजवळ अडकलेल्या स्थितीत दिसून आले. मात्र त्याची सुटका करणे जोखमीचे काम असल्याने त्यांनी कोकण वाईल्ड लाईफ एमेरगेंचय रेस्क्यू फॉर्म सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधत त्यांना पाचारण केले. कोकण वाईल्ड लाईफ एमेरगेंचय रेस्क्यू फॉर्म सिंधुदुर्ग सदस्य संजयकुमार कुपकर, आनंद बांबर्डेकर, नाना तांडेल हे त्याठिकाणी दाखल झाल्यावर त्यांनी आँलिव्ह रिडले कासवाला सुरक्षितपणे टियान मधुन बाहेर काढले. त्यानंतर या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. यामुळे कासवाला जिवदान मिळाले.  

दरम्यान काही दिवसांपूर्वी याचठिकाणी तुषार गावकर व प्रमोद गावकर यांना कासवाची अंडी आढळून आली होती. त्यांनी वनविभागाच्या मदतीने अंड्यांच्या भोवती जाळी लावून त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवली आहेत. संरक्षित अशा कासवांच्या बाबतीत मालवणच्या किनारपट्टीवर स्थानिक मच्छीमार व नागरिक दाखवत असलेली जागरूकता समुद्री जीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची ठरत आहे.

You cannot copy content of this page