सत्तेतून पैसा आणि आणि पैशातून सत्ता हे नितेश राणे यांचे राजकारण:सतीश सावंत
कणकवली ता.१२-:* संतोष परब हल्लाप्रकरणांमध्ये ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं . त्या हत्येचा कट रचणाऱ्या आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली . अजून केसचा निकाल लागलेला नाही . अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जो स्वागताचा कार्यक्रम सुरू आहे तो सुसंस्कार संपत चालल्याचा भाग आहे .सत्तेतून पैसा आणि आणि पैशातून सत्ता हे नितेश राणे यांचे राजकारण आहे .विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत धनशक्तीच्या बळावर निवडणुका जिंकायच्या असे सत्र नितेश राणे यांनी केले आहे. इथेच आले तुम्ही तोंड उघडाच मग कुणाचा बीपी वाढतो, कुणाला उलट्या होतात आणि कोण आजारी पडतो हे तुम्हाला समजेल असा टोला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी लगावला आहे . शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद शिवसेना नेते सतीश सावंत बोलत होते .
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, सचिन सावंत,संतोष परब,रूपेश आमडोस्कर व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश सावंत म्हणाले, नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडी रवानगी झाल्यानंतर ते आजारी पडले त्यांना उलट्या होऊ लागल्या, त्यांच्या छातीत दुखू लागले. केवळ न्यायालयीन कोठडीत जाऊ नये यासाठी त्यांचे दुखणे होते. एखाद्या सिने अभिनेत्याला लाजवेल असा अभिनय नितेश राणे यांनी केला असे सांगताना सतीश सावंत म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक व राजकीय दृष्ट्या नेहमीच वैशिष्टपूर्ण राहिला आहे . पण कै. आप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींच्या पदस्पर्शाने संस्कारित झालेल्या भूमीत घडत असलेल्या आताच्या राजकीय घटना पाहता समाजाच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते .
खर तर जिल्ह्यातील सुसंस्कारित जनतेने आता जाग व्हायलाच हवं नाहीतर येथील आप्पासाहेब पटवर्धन , बॅ . नाथ पै , मधु दंडवते यांचे आदर्श या नव्या पिढीला समजणार नाहीत . न्याय देवते समोर सगळे सामान आहेत हे न्याय देवतेने दाखवून दिले . व पुढेही सत्य समोर येईलच . लोकशाहीत भारतीय राज्य घटना व न्याय व्यवस्था या पुढे कोणीही मोठा नाही . हे ही आपणाला समजेल .नितेश राणे यांच्या सारख्या प्रवृत्तीला पाठीशी घालतोय हे सारे भयावह आहे .
ते प्रामाणिक असते ,घडलेल्या चुकीच्या घटनेशी त्याचा काहीही संबंध नसेल तर भीती का वाटते . खोटं आजारी पडल्याचे नाटक करून सरकारचा पर्यायाने गोरगरीब जनतेच्या पैसा अवास्तव खर्च करून शासकीय यंत्रणेला विनाकारण कामाला लावून जामीन मिळाल्यानंतर आपली प्रकृती बिघडली होती हे विसरून परत प्रचारात सक्रिय होणे हे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे आहे . आम्ही असा अभिनय फक्त सिनेमात पाहिला होता . त्यामुळे आमदार नेत्यापेक्षा अभिनेते झाले असते तर बरे झाले असते असेच जनता म्हणतेय . पण सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे ती योग्य वेळी आपला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही .
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे . खून मारामारी दहशतीने नाही . पण नथुरामची पाठराखण करणाऱ्यांना कदाचित यात काहीच वावगं वाटत नसेल तर खरा न्याय योग्य वेळी आप्पासाहेब पटवर्धन , बॅ . नाथ पै , मधु दंडवते यांचे आदर्श माननारी सिंधुदुर्गची जनता निश्चितपणे देईल हे निश्चित . सतीश सावंत पुढे म्हणाले, राणे यांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे ते या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर साधी चौकशी करण्याचे सौजन्य राणे यांनी दाखवले नाही.
त्यामुळे केंद्रीय मंत्री असूनही जिल्ह्यातील जनतेची त्यांना काळजी नाही हे दिसून आले. तुम्ही लोकसेवक असता तर निश्चितपणे संतोष परब याला पाहण्यासाठी गेला असता असे सतीश सावंत म्हणाले. निदान या घटनेने तरी नितेश राणे सदर सुधरतील कसे आम्हाला वाटले होते परंतु त्यांच्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही लोकशाहीत त्यांच्या नोंद कृत्याची नोंद घेतली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापर्यंत नितेश राणे यांची मजल गेली आहे . नितेश राणे. तुम्ही तोंड उघडत त्यानंतर तुम्हाला समजेल कुणाचा बीपी वाढतो असल्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही तर शिवसेना जशास तसे उत्तर देईल असे सांगतानाच एकेकाळी भाजपा गुंडांचा पक्ष आहे असे म्हणणारे नारायण राणे यांना गुंडगिरी कोणी सुरू केले हे माहित नाही का? आणि माहीत नसेल तर भाडोत्री गुंड कसे आणले जातात? हे नितेश राणे यांना विचारा असा सल्ला सतीश सावंत यांनी दिला.
