मराठा समाज वधू-वर मेळाव्याला सर्वोतोपरी सहकार्य करणार

श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांचे आश्वासन;मराठा समाज संघटनेने भेट घेत केली चर्चा

सावंतवाडी ता.१२-: वधू-वर मेळाव्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील समाजाच्या हितासाठी असलेले सर्व उपक्रम आपण राबवावेत असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी मराठा समाज बांधव संघटनेशी झालेल्या चर्चे दरम्यान केले यावेळी शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत देखील चर्चा झाली

मराठा समाज बांधव संघटनेचे अध्यक्ष सदासेन सावंत आणि संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा नीलम धुरी यांनी श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांची आज भेट घेतली दरम्यान यावेळी वधू-वर मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली व वधू-वर मेळाव्याची तारीख देखील निश्चित करण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डी टी देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डी एल भारमल, पूनम सावंत आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page