Headlines

पतंजली समितीच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन….

पंतंजली योग समिती व विठ्ठल मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन…

सावंतवाडी ता.१२-:* पतंजली योग समितीच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त पतंजली योग समिती सावंतवाडी व विठ्ठल मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विनाशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 6 ते 7 : 30 या वेळेत होणार आहे. कोविड च्या अटींची पूर्तता करून हे शिबिर मर्यादित साधकांच्या उपस्थितीत होणार असून स्पर्धकांनी महेश भाट, जनता मेडिकल यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे शिबिर येथील विठ्ठल मंदिराच्या माडीवर होणार असून या शिबिरात सर्वांना निरोगी निरामय जीवन जगता यावे याकरिता रामदेव बाबांनी सांगितलेले प्राणायामाचे सर्व प्रकार आणि योगासने योग शिक्षक रामनाथ सावंत, महादेव परब, शरद कालेलकर, दिलीप भाईप,भरत गावडे, विकास गोवेकर व दत्तात्रय निखार्गे शिकवणार आहेत या शिबिरास भारत स्वाभिमानाचे जिल्हा प्रभारी महेश भाट, सुभाष गोवेकर, ज्येष्ठ योगशिक्षक दत्ताराम सडेकर, युवा प्रभारी विद्याधर पाटणकर, आदर्श शिक्षक रावजी परब, तानाजी वरक आदि चे विशेष मार्गदर्शन होणार आहे

You cannot copy content of this page