Headlines

एस.टी.एस परिक्षेत तळवणे नं. ४ शाळेचे यश…

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत तळवणे नं. ४ शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले. या परीक्षेत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीतील टॉप ५० मध्ये स्थान मिळवत शाळेच्या लौकिकात भर घातली.कु. श्रावणी शिवाजी कवडे हिने १४ वा क्रमांक मिळवला ,तर कु. गौरांग बाबू वैज याने ३९ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे शाळेतील सर्वच…

Read Full News

वेंगुर्ला वायंगणी बीचयेथे उद्या 10 एप्रिल रोजी कासव महोत्सवाचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.०९-: महाराष्ट्र शासनकांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र (कांदळवन) मालवण व वायंगणी ग्रामपंचायतयांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १० एप्रिल सकाळी ७.३० वा. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीचयेथे कासव महोत्सव २०२६चे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा. मान्यवरांचे आगमन व स्वागत, सकाळी ८ वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या हस्ते…

Read Full News

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. गिरीश चौगुले…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. गिरीशकुमार विवेकानंद चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली असून दि. 2 एप्रिल रोजी ते सेवेत रुजू झाले आहेत. डॉ. संदीप सावंत यांची पदोन्नतीने जिल्हा रुग्णालय ओरोस येथे बालरोगतज्ञ -वर्ग १ म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित येथे नूतनअधिकारी – वैद्यकीय अधीक्षक दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले…

Read Full News

वेतोरे देऊळवाडी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू…

⚡वेंगुर्ला ता.०८-: तालुक्यातील वेतोरेदेऊळवाडी येथील रहिवासी (सेवानिवृत्त वायरमन ) विष्णू विश्राम कांबळी ( वय 75) हे आज बुधवार 8 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिस मधून घरी जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान वेंगुर्ला पोलिसांनी पंचनामा केल्यावर रात्री…

Read Full News

गाव – वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय – तुळस पीएचसी प्रवास नातेवाईकांसाठी ठरतोय त्रासदायक…

जिल्हा परिषद शिक्षण -आरोग्य सभापती प्रितेश राऊळ लक्ष पुरविणार का?.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला शहरात अद्ययावत असे उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय नागरिकांसाठी संजीवनी मानले जात आहे. परंतु या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहाचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल संपूर्ण तालुक्यातून नागरिकांतून व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्याकडे नूतन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश…

Read Full News

बांदा येथे ‘खासदार नारायण राणे चषक’ क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन…

⚡​बांदा ता.०८-:क्रीडा क्षेत्राकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता एक करिअर म्हणून पहा. आज क्रीडा क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू निर्माण व्हावेत, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन जि प अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. ​बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘खासदार नारायण राणे चषक’…

Read Full News

तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित…

कालावल खाडीत वाळू उपसा बंद करण्याचे आमदार निलेश राणे यांचे आश्वासन:अवैध उपशावर कडक कारवाईचे निर्देश.. ⚡मालवण ता.०८-:कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाबाबत आज ओरोस येथे जिल्हाधिकारी तसेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी व तळाशील ग्रामस्थ यांच्यात बैठक झाल्यानंतर आज सायंकाळी आम. निलेश राणे यांनी यांनी…

Read Full News

कुडाळ मध्ये आरोग्य आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या आरोग्य शिबिराला आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी…

Read Full News

दोडामार्ग सरपंच समितीच्या अध्यक्षपदी गणेशप्रसाद गवस यांची निवड…

⚡दोडामार्ग ता.०८-:तालुक्यातील ग्रामविकासाला गती देण्यासाठी पंचायत समिती दोडामार्ग अंतर्गत सरपंच समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली असून उपसभापती गणेशप्रसाद शंकर गवस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावपातळीवरील विविध प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढण्यास मदत होणार असून प्रशासन आणि ग्रामपंचायती यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार आहे असल्याचेही यावेळी उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले….

Read Full News

जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न…

⚡सिंधुर्दुर्गनगरी ता.०८-: जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainer) यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक ०६ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२६ या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाले.आयोजित प्रशिक्षण शिबिरास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २४ फील्ड ट्रेनर्स उपस्थित…

Read Full News

You cannot copy content of this page