Headlines

दाभोलीश्री देव नारायण चा वर्धापनदिन कार्यक्रम उद्या…

⚡वेंगुर्ला ता.०९-: तालुक्यातील दाभोलीश्री देव नारायण चा 13 वा वर्धापनदिन शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी पूजाविधी, सत्यनारायण पूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 5 वाजता कु. सानिका संदिप गोखले [संगीत विशारद) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे.भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन…

Read Full News

शिरोडा येथील गुन्ह्यातील दोन्ही संशयितास न्यायालयीन कोठडी…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा येथील युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न करुन फरार झालेल्या गुन्हयातील संशयित दर्शन दयानंद गडेकर( वय 25 वर्षे),भुषण दयानंद गडेकर (वय30 वर्षे) दोन्ही रा.शिरोडा खासबागवाडी ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग यादोन संशयिताना वेगुर्ला पोलीसांनी मोठ्या शिताफीने शोध घेऊन सावंतवाडी बावळाट येथुन त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती….

Read Full News

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य अमृत महोत्सवी सोहळा…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती; सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट ठरणार मुख्य आकर्षण.. कणकवली : नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस आज कणकवली येथे भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार असून यानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप व महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे. सायंकाळी ६ वाजता उपजिल्हा…

Read Full News

भरधाव दुचाकीची कारला धडक; दुचाकीस्वार जखमी…

मोबाईलवर बोलताना सुटले नियंत्रण; जाणवली गावठणवाडी येथे अपघात.. ⚡कणकवली ता.०९-:कणकवलीहून तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसून दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जाणवली गावठणवाडी बसथांब्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार कणकवलीहून तळेरेकडे जात होती. त्याचवेळी समोरून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वेग जास्त असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले….

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक मतदारसंघात विविध उपक्रम संपन्न…

⚡कणकवली ता.०९-: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्रीतथा सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत हरकुळ खुर्द येथील शृंगेश्वर गणेश मंदिरात गणेश याग विधिवत पार पडला. धार्मिक वातावरणात संपन्न…

Read Full News

पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

⚡दोडामार्ग ता.०९-: शहराच्या बाजारपेठेतील आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहरासह तालुक्यातील व बाहेरील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संपूर्ण बाजारपेठ ‘पिंपळेश्वरमय’ झाली होती.सकाळी वझरे येथील भटजी श्री. दामले यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यनारायण महापूजा पार पडली. शुभम अनिल सांबारी व दिक्षिता शुभम सांबारी यांनी यजमानपद भूषविले. आरती,…

Read Full News

“येग येग चिऊताई…” या हाकेला प्रतिसाद देत घारपी शाळेचा हृदयस्पर्शी उपक्रम…

स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांकडून चिमण्यांसाठी घरटी व पाण्याची सोय.. ⚡बांदा ता.०९-: एकेकाळी प्रत्येक अंगणात, प्रत्येक झाडावर आणि घराच्या कडेला सहज दिसणारी चिमणी आज हळूहळू आपल्यापासून दूर जात आहे. वाढते शहरीकरण, झाडांची कमतरता आणि उन्हाळ्याची तीव्रता यामुळे या छोट्या पक्ष्यांचे जीवन कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्काऊट-गाईड व कब-बुलबुल…

Read Full News

*नवीन काळाशी जुळवून घेऊन संस्काराची मुळे घट्ट ठेवा…

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत:शिक्षक समिती सावंतवाडीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०९-: शिक्षकांच्या विचारांना दिशा देणारे, अनुभवांची देवाणघेवाण घडवणारे आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवणारे अधिवेशन हे व्यासपीठ आहे. शिक्षकहो,”नवीन काळाशी जुळवून घ्या, पण आपल्या संस्कारांची मुळे घट्ट ठेवा.”“तंत्रज्ञानाचा वापर करा, पण मानवी मूल्ये विसरू नका.” असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक…

Read Full News

पुण्यातील बैठकीत बोगस खतं-किटकनाशकांचा मुद्दा तापला…

कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तातडीची मागणी. ⚡देवगड ता.०९-: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कृषी आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी मा. खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथील कृषी…

Read Full News

वेंगुर्ले वायंगणी बीच येथे १० रोजी कासव महोत्सव २०२६ चे आयोजन…

⚡वेंगुर्ले ता.०९-: कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र (कांदळवन) मालवण यांच्या विद्यमाने शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी “कासव महोत्सव २०२६” चे आयोजन वेंगुर्ले वायंगणी बीच वर करण्यात आले आहे.या महोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून मंत्री मत्स्य व्यवसाय व बंदरे महाराष्ट्र तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे असून,प्रमुख अतिथी म्हणून लोकसभा सदस्य सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे नारायण राणे…

Read Full News

You cannot copy content of this page