Headlines

चार वर्षांनंतर पंचायत समितीची ‘नवी सुरुवात’…

पहिल्याच सभेत प्रशासनाला सुनावणी:शेतकरी, पाणीपुरवठा व योजनांवर जोरदार चर्चा; सभापती गणेश राणे यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश.. ⚡देवगड ता.०८-:चार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर देवगड पंचायत समितीची मासिक सभा आज छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली ही पहिलीच सभा ठरल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते. यावेळी उपसभापती अमोल…

Read Full News

सावंतवाडीत अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या…

⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आज राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तालुक्यातील युवक- युवतींच्या वाढत्या आत्महत्या बघता हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यात आज ही घटना घडली. ही मुलगी अल्पवयीन असून राहत्या घरी गळफास घेत तिने आत्महत्या केली. तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी पोलिस दाखल…

Read Full News

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न…

⚡सिंधुदुर्गनगरी, ता.०८-: सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणीचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या सादरीकरणावर समितीने सूक्ष्म निरीक्षण करत काही आवश्यक बदल सुचवले असून,…

Read Full News

समता सप्ताहात विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात प्रारंभ…

⚡ओरोस ता ८-: जिल्ह्यात आज पासून सुरू झालेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा समीक्षा चंद्राकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी १४ एप्रिल पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण संतोष चिकने यांनी केले आहे.राज्यात ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक…

Read Full News

दाभोली येथे घरात शिरलेल्या बिबट्यास जेरबंद…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली कोऱ्याचीवाडी येथील विवेक गुरुनाथ जोशी यांच्या स्वयंपाकघरात आज बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चक्क बिबट्या शिरल्याने सर्वांची एकच तारांबळ उडाली. याबाबत माहिती मिळाल्यावर वनविभागाने बिबट्यास सुरक्षितरित्या रेस्कयू करण्यात यश मिळविले. यावेळी वनविभाग चे वनपाल सावळा कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी पथक या मोहिमेत सहभागी झाले होते.यावेळी सरपंच उदय गोवेकर, पोलीसपाटील जनार्दन…

Read Full News

उबाठा शिवसेनेच्या मोर्चाच्या घोषणेनंतर मत्स्यमंत्र्यांना जाग आली…

एलईडी लाईट मत्स्यव्यवसायिकांचे सत्ताधाऱ्यांशी लागेबंधे :माजी आमदार वैभव नाईक यांची टीका.. ⚡मालवण ता.०८-:गेले दोन वर्षे मत्स्यमंत्री असणाऱ्या ना. नितेश राणे यांनी दोन वर्षात कधीही मच्छिमारांचा विचार केला नाही. बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारीचा हैदोस वाढला असून या विरोधात उबाठा शिवसेनेने मोर्चा काढण्याचे जाहीर केल्यानंतर मत्स्यमंत्र्यांना जाग आली असून त्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन एलईडी लाईट मासेमारी मोठ्या…

Read Full News

शिरशिंगे राणेवाडी मुख्य रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर…

संजू परब यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ: आमदार केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून रक्कम मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.०८-: शिरशिंगे येथील राणेवाडी मुख्य रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी 5 लाख रुपये मंजूर झाले असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ आज जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात…

Read Full News

कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य कार्यक्रम…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती:पुस्तक भेट उपक्रम आणि सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आकर्षण.. ⚡कणकवली ता.०८-: कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल रोजी कणकवलीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजप…

Read Full News

श्री देव पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उद्या…

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.. दोडामार्ग :संपूर्ण दोडामार्ग शहरवासीयांचे आराध्य दैवत श्रीदेव पिंपळेश्वर देवस्थानचा १९ वा वर्धापन दिन उद्या 9 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा चे आयोजन करण्यात आले आहे तर १० वाजता आरती व…

Read Full News

मनसे तळाशील वासियांच्या कायम सोबत राहणार…

मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर.. ⚡मालवण ता.०८-:अनधिककृत वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनात मनसे पक्ष तळाशील ग्रामस्थांच्या सोबत असल्याची भूमिका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी स्पष्ट केली आहे. गेले काही महिने अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात तळाशील वासियांनी अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असा मनसेचा आरोप आहे. एवढ्या गंभीर स्वरूपाचे आंदोलन करून…

Read Full News

You cannot copy content of this page