Headlines

ओटवणेत रवळनाथ मंदिरात २१ जूनला धार्मिक कार्यक्रमांसह ‘कुरुक्षेत्र’ दशावतारी महानाट्याचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१९-: आतुरता ग्रुप गावठणवाडी ओटवणे यांच्या वतीने रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी श्री रवळनाथ मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10.00 वाजता — अभिषेक,दुपारी 12.30 वाजता — आरती,दुपारी 1.00 वाजता — महाप्रसाद,रात्री ठीक 8 वाजता, कु. सागर विठ्ठल गावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल एक अद्भुत, पौराणिक आणि रहस्यमय संघर्षयुक्त संयुक्त कलाकारांच्या संचातील दशावतारी महानाट्य”कुरुक्षेत्र” सादर केल जाणार आहे. तरी भाविक व नाट्य रसिक यांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन आतुरता ग्रुप, गावठणवाडी ओटवणे.यांनी केले आहे.

You cannot copy content of this page