Headlines

कालावल खाडीत महिलांचे आंदोलन तीव्र; पाण्यात उतरून प्रशासनाविरोधात संताप…

⚡मालवण ता.०७-:कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाचे स्वरूप आज अधिकच तीव्र बनले. मागण्या पूर्ण न झाल्यास खाडीपात्रात उड्या घेऊन जीवन संपवू असा इशारा देणाऱ्या तळाशीलच्या महिलांनी अखेर आज प्रशासनाशी चर्चा फिसकटल्याने सायंकाळी खाडीपात्रात उतरत आंदोलन अधिक तीव्र केले. यावेळी पाण्यात उतरलेल्या महिलांपैकी एक ज्येष्ठ महिला अत्यवस्थ बनल्याने…

Read Full News

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांची रायगडावर ट्रेकिंग मोहीम…

⚡मालवण ता.०७-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागामार्फत ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली. साहसी व शिस्तीचे धडे देणाऱ्या या उपक्रमात एकूण २९ विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. एनसीसी विभागामार्फत दरवर्षी विविध ठिकाणी ट्रेकिंग कॅम्प आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कठोर परिश्रमाची सवय, शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रतिकूल…

Read Full News

सीटीईटी परीक्षेत डी.एड. कॉलेज मालवणच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.०७-:केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२६ च्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत डी.एड. कॉलेज मालवणच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल ३० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या परीक्षेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजमधील संग्राम सतीश कासले, मानसी…

Read Full News

उत्तम पवार स्मृतीनिमित्त कणकवलीत दर्पण आयडॉल २०२६ ; महाअंतिम स्पर्धा…

९ एप्रिल ला रंगणार सांगीतिक जल्लोष.!. कणकवली : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय दर्पण आयडॉल २०२६ कराओके गीतगायन स्पर्धेची महाअंतिम फेरी गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रम मराठा मंडळ नाट्यगृह, कणकवली येथे होणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत गायक-गायिका सहभागी होणार असून, नामवंत परीक्षकांच्या उपस्थितीत अंतिम…

Read Full News

सावंतवाडीत हॉटेल व्यावसायिकांना नॅचरल गॅस कनेक्शन; दीड महिन्यात ४१ जणांना दिलासा…

सावंतवाडी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा आणि त्यामुळे हॉटेल व्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, सावंतवाडी नगरपरिषदने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. शहरातील ४१ हॉटेल व्यावसायिकांना येत्या दीड महिन्यात नॅचरल गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत ही…

Read Full News

व्हॉट्सअ‍ॅप APK फाईलद्वारे ऑनलाईन फसवणूक,देवगडमध्ये ७.९२ लाखांचा गंडा…

सावंतवाडी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा आणि त्यामुळे हॉटेल व्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, सावंतवाडी नगरपरिषदने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. शहरातील ४१ हॉटेल व्यावसायिकांना येत्या दीड महिन्यात नॅचरल गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत ही…

Read Full News

बांदा येथे खासदार नारायण राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्या शुभारंभ…

⚡बांदा ता.०७-: बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या खासदार नारायण राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ठीक ९ वाजता पार पडणार आहे. या समारंभाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला आघाडी अध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष…

Read Full News

बंधाऱ्यावरून जाताना दुचाकी घसरली…

शिवडाव जाधववाडी येथील १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू.. ⚡कणकवली ता.०७-: तालुक्यातील गड नदी पात्रात शिवडाव ते सांगवे दरम्यानच्या कच्च्या बंधाऱ्यावरून जात असताना दुचाकी घसरल्याने १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. उत्कर्ष मनोहर जाधव (वय १७, रा. शिवडाव – जाधववाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्ष…

Read Full News

इन्सुली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०७-: इन्सुली-सावंतटेंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १० येथे सुयश हॉस्पिटल कुडाळ, बांदेश्वर डायग्नोस्टिक पॉलिक्लिनिक व आयकेअर सेंटर बांदा तसेच पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे मित्र मंडळ, इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिराचे आयोजन पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते….

Read Full News

पावसाळ्यापूर्व तयारीला वेग, बांद्यात विद्युत वाहिन्यांलगत झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू…

⚡बांदा,ता.०७-: बांदा शहरात पावसाळ्याच्या काळात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी गवळीटेंब येथे विद्युत वाहिन्यांवर झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. यासाठी महावितरणकडून क्रेन उपलब्ध करून देण्यात आली होती.भाजपाचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या सावंतवाडी…

Read Full News

You cannot copy content of this page