Headlines

पत्रकार देवयानी वरसकर यांना मातृशोक…

⚡ओरोस ता ७-: मालवण तालुक्यातील वराड येथील श्रीमती शोभा प्रभाकर वरसकर वय ७८ यांचं सोमवारी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. गेले पंधरा दिवस त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार देवयानी वरसकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, दीर, वहिनी असा मोठा परिवार आहे. मंगळवारी सकाळी वराड येथे त्यांच्यावर…

Read Full News

मतदान नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, कणकवली यांचे नागरिकांना आवाहन…

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत सूचना.. ⚡कणकवली ता.०७-: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कणकवलीचे मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे. या कार्यक्रमांतर्गत सध्या अस्तित्वात…

Read Full News

जिल्हा प्रशासनाने गाठली संवेदनशून्यतेची हद्द …

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची टीका.. कुडाळ : सिंधुदुर्गात प्रशासनाची संवेदनशून्यतेची ‘हद्द’ गाठल्याची टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. तळाशील ग्रामस्थांचे जलआंदोलन सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांसहित जिल्हा प्रशासनातील अधिकारी नाच-गाण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी केली जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला…

Read Full News

५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी फिजीशीयन…

नागरिकांना मोठा दिलासा: नगरसेवक देवी या सूर्याजी यांनी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांचे मानले आभार.. सावंतवाडी : गेली ५ वर्ष सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ फिजीशीयन मिळावा म्हणून सामाजिक संघटनांनी आंदोलन, उपोषणासह सर्व मार्ग अवलंबले होते. अखेर आज ही मागणी पूर्ण झाली असून सावंतवाडीला कायमस्वरूपी फिजीशीयन मिळाला आहे. यासाठी रूग्णकल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी…

Read Full News

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्री 2026 शरीरसौष्ठव स्पर्धा…

विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने आयोजन.. ⚡कणकवली ता.०७-: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने ‘खासदार श्री २०२६’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा दि. १० एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. सदरची स्पर्धा ५५,…

Read Full News

मठ व दाभोली सडा येथे आकस्मिक आग लागून काजू नुकसान…

वेंगुर्ला अग्निशमक बंब च्या सहकार्याने आग आटोक्यात.. ⚡वेंगुर्ला ता.६-: तालुक्यातील दाभोली सड्यावर (पवनचक्की नजिक) येथे आज सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आकस्मिक आग लागून येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमांचे जळून नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच माजी जि. प. सदस्य बाबा राऊत, दाभोली माजी सरपंच सुचिता गोलतकर, पोलीसपाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष दाभोलकर, ग्रा. पं. सदस्य…

Read Full News

हुंबरठ येथे दुचाकीचा अपघात : दोघे गंभीर जखमी…

⚡कणकवली ता.०६-: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ येथील पावणादेवी मंदिरानजीक दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या दरम्यान घडला. या अपघातात लबिक पटेल (वय २०, रा. हरकुळ खुर्द, ता. कणकवली) व केतन वाडे (वय २८, रा. मुंबई) हे दोघे गंभीर जखमी झाले. दुचाकीचा वेग जास्त…

Read Full News

साकेडी फाट्यावर पहाटे अपघात…

अज्ञात वाहनाच्या धडकेत टेम्पो चालक गंभीर जखमी.. ⚡कणकवली ता.०६-: मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली साकेडी फाटा येथे सोमवारी पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडा येथील योगेश प्रभूदेसाई यांच्या टेम्पोवर मगदूम महम्मद अली शेख (रा….

Read Full News

चुलीवर भाकरी करत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन…

गॅस टंचाईविरोधात कणकवलीत अनोखा निषेध.. कणकवली : देशभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले. प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चूल मांडून महिलांनी भाकरी व खिचडी तयार करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार…

Read Full News

वेंगुर्ला श्री देव रामेश्वर देवस्थान ” क ” वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र बाबत ठराव मंजूर…

वेंगुर्ला श्री देव रामेश्वर देवस्थान ” क ” वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र बाबत ठराव मंजूर.. वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सभा आज सोमवारी (6 एप्रिल ) वेंगुर्ला नगरपरिषद श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी वेंगुर्ला श्री देव रामेश्वर देवस्थान ” क ” वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र बाबत विशेष सभेत…

Read Full News

You cannot copy content of this page