Headlines

साटेली-भेडशीची सई धर्णे देशात २५वी; GPAT परीक्षेत दैदीप्यमान यश…

⚡दोडामार्ग ता.०७-:तालुक्यातील साटेली-भेडशी येथील सई मारुती धर्णे हिने पदवीधर फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट (GPAT) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत देशात २५वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. National Board of Examinations in Medical Sciences मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेस देशभरातून सुमारे ५३,६१७ उमेदवार सहभागी झाले होते.सईने दहावीपर्यंतचे शिक्षण करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल, साटेली-भेडशी येथे, तर बारावीचे…

Read Full News

सावंतवाडीत नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

संजू परब: महिला आघाडीतर्फे देखील विविध कार्यक्रमाच आयोजन.. सावंतवाडी : कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली….

Read Full News

चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा…

सिंधुदुर्गचे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांचे निर्देश:सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना.. ⚡मुंबई, दि.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

Read Full News

काजू चोरी प्रकरणी काजू व्यापाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी आणि एसपींची भेट…

⚡कुडाळ ता.०७-: गेल्या आठवडाभर जिल्ह्यात काजू चोरीच्या मालवण, बांदा व कुडाळ याठिकाणी ज्या घटना घडल्या आणि यामध्ये ज्या जिल्ह्यातील काही वर्ष अतिशय प्रामाणिकपणे हा काजू उद्योग करणारे उद्योजक आहेत, त्यानी या काजू खरेदी केल्या म्हणून पोलीसांनी जणू काजू खरेदी करणारेच गुन्हेगार आहेत अशा प्रकारची भूमिका घेतल्याने जो या व्यापाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा…

Read Full News

मोर्ले केरमध्ये हत्तींचा धुमाकूळ…!

⚡दोडामार्ग ता.०७-: तिलारी खोऱ्यातील मोर्ले केर गावात पाच हत्तींचा कळप फिरत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काजू हंगाम सुरू असताना हत्ती बागांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. काजू बोंडांचा वास लागल्याने सोमवारी सकाळी एका हत्तीने रस्त्यावर येत सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प केली. वन कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलून लावले.दरम्यान, अचानक हत्ती समोर आल्याने मोटारसायकलवरील बहीण-भाऊ घसरून पडले व…

Read Full News

देवगड पंचायत समिती सभापतींची वरेरी ग्रामपंचायतीस भेट…

योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेत केली कामकाजाची पाहणी.. ⚡देवगड ता.०७-:देवगड पंचायत समिती सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा समस्या अशा विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तालुका पातळीवर स्थानिक ग्रामस्थांकडून विविध तक्रारी येत असल्याने कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सभापती गणेश राणे व उपसभापती…

Read Full News

दोडामार्ग : प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत २८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित…

⚡दोडामार्ग ता.०७-: कसई–दोडामार्ग नगरपंचायतमार्फत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत २८ लाभार्थ्यांना घरकुलासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली.नगरपंचायत येथे लाभार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लाभार्थ्यांनी आपल्या समस्या मांडाव्यात व त्यांचे तातडीने निराकरण…

Read Full News

जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ…

जनगणनेत प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका महत्त्वाची:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुर्दुर्गनगरी ता.०७-: जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती संकलनासाठी प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व फिल्ड ट्रेनर यांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी फिल्ड ट्रेनर यांना दिल्या.जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या प्रयत्नांना यश…

आय.सी.यु कार्यान्वित:फिजिशियन व्ही.एन.रेड्डी हजर.. ⚡सावंतवाडी, ता.०७-: रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांचा प्रश्न जटील झालेल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ.विशाल उर्फ व्ही.एन.रेड्डी (M.D.फिजिशियन)आज सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीच्या मागणीला यश आले आहे. कृती समितीच्यावतीने आज डॉ. रेड्डी यांचे स्वागत करण्यात आले.डॉ. रेड्डी हजर झाल्याने सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील आय.सी.यु. युनिट पूर्ण…

Read Full News

भाजपा स्थापना दिन व जागतिक आरोग्य दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप…!

⚡सावंतवाडी ता.०७-:भाजपा स्थापना दिन आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आयुर्वेदीक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे रुग्णांना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे तसेच आयुर्वेदीक रुग्णालयाचे डॉ. राजेशकुमार गुप्ता…

Read Full News

You cannot copy content of this page