Headlines

५० वर्षानंतर सुरू झाली माठेवाडा येथील देवाची पाणंद…

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण..

कुडाळ : शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील माठेवाडा येथील देवाची पाणंद गेली ५० वर्ष बंद होती ही पाणंद कॉंक्रिटीकरण करून बांधण्यात आली. याचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फित कापून झाला. ही देवाची पाणंद सुरू झाल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
माठेवाडा मधून श्रीदेवी केळबाई मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूर्वी वाट होती आणि त्या वाटेला देवाची पालन असे बोलले जात होते काही काळाने ही पाणंद बंद झाली आणि त्या ठिकाणी सांडपाणी व झाडाझुडपाणी ही वाट व्यापून गेली ही पाणंद सुरू करण्यासाठी या प्रभागाचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी प्रयत्न सुरू केले आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली देवाची पाणंद कॉंक्रिटीकरण करण्याचे काम नगरपंचायतीच्या माध्यमातून केले यासाठी नगरोत्थोमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला ५० वर्षांपूर्वी बंद पडलेली ही देवाची पाणंद आज (गुरुवारी) आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फित कापून सुरू करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, ओंकार तेली, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गोगटे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, गणेश भोगटे, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते. देवाची पाणंद सुरू झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

You cannot copy content of this page