Headlines

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती…

घावणळे-माणगाव यांना नानेली येथे जोडणाऱ्या ब्रिजसाठी १० कोटींचा निधी मंजूर..

⚡कुडाळ ता.१८-: विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. नानेली येथे कर्ली नदीवर पूल नसल्याने स्थानिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. या बाबत आमदार निलेश राणे यांनी माणगाव व घावनळे या दोन विभागांना जोडणारा ब्रिज नानेली येथे मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते, व त्यानुसार पाठपुरावा केला होता. त्याला आता मूर्त स्वरूप आले असून पंतप्रधान सडक योजनेतून १० कोटी रुपये खर्च करून नानेली येथे उंच पातळीच्या पुलाची उभारणी होणार आहे.

आमदार निलेश राणे यांनी आपल्या मागणीची दखल घेत १० कोटींचा भरगोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य दीपक नारकर, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जि. प. सदस्य रुपेश कानडे, शिवसेना विभाग प्रमुख सचिन धुरी आदीं खासदार नारायणराव राणे पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page