Headlines

मळगाव-तेलकाटावाडी येथे वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती महिलांचा वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने ब्राम्हणाच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवोदित जोडप्यांनीही वडाची पूजा करून वटपौर्णिमा सण साजरा केला. सौभाग्यवती स्त्रियांच्या महत्वाच्या सणांपैकी वटपौर्णिमा हा एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे…

Read More

कळसुली जि.प.मतदारसंघात
भात बियाणे व खत वाटप

⚡कणकवली ता.१४-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कणकवली तालुक्यातील कळसुली गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद कळसुली मतदारसंघात, युवक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा नियोजन सदस्य तथा, प्रफुल्ल सुद्रीक, यांच्या प्रमुख उपस्थितीत भात बियाणे व खत वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, भरत गांवकर, ग्रा. प. सरपंच साक्षी परब, ग्रां….

Read More

थांबलेल्या वाहनाला अज्ञात
वाहनाची धडक ;एक गंभीर

नांदगाव परिसरात अपघातांची मालिका सुरूच कणकवली 14 जून (प्रतिनिधी)-मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून पहाटे ३ वा.च्या दरम्यान नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर थांबलेल्या वाहनाला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी इको कार नांदगाव ओटव फाटा…

Read More

निधी अभावी रखडलेली १२७ शाळांची दुरुस्ती आता होणार

शासनाकडून थकित निधी प्राप्त ओरोस ता.१४-: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या १२७ शाळांच्या शाळा दुरुस्ती निधी अभावी रखडल्या होत्या. शासनाने तब्बल पावणे दोन वर्षानी दुसऱ्या हप्त्याचा निधी उपलब्ध करून दिल्याने या शाळांचा दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील मोठ्या दुरुस्त्या आवश्यक असलेल्या १२९ शाळांना दुरुस्तीसाठी २०२०-२१ मध्ये…

Read More

३७८० मेट्रिक टन खत उपलब्ध

१२ हजार ५०० मेट्रिक टन खत मिळणार सिंधुदुर्गनगरी ताजिल्हा परिषद कृषि विभागामार्फत खरीप हंगाम २०२२ साठी सुधारित ७३३५ क्विंटल व संकरित २९० क्विंटल असे एकुण ७६२५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली .त्यापैकी आतापर्यंत ४१९५ क्विंटल भात बियाणे प्राप्त झाले आहे.तर १७२९ क्विंटल बियाण्याची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांनी आज दिली….

Read More

राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा वृक्ष लागवडीचा प्रारंभ

सिंधुदुर्गनगरी तासामाजिक वनीकरण विभागाकडून हायवे दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ कसाल येथून करण्यात आला. सामाजिक वनीकरण कुडाळ विभागाच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून वृक्ष लागवड मोहिमेस कसाल येथून सुरुवात करण्यात आली.यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्री सातपुते,वनपाल…

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥 🎊शुभेच्छा🎊🎂 शुभेच्छा🎊🎂 शुभेच्छा🎊🎂 🎂🎊🎈महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हिंदू जननायक मा.श्री.राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎈🎂🎊 ▪️💐 श्री.गुरूदास गवंडे(तालुकाध्यक्ष;सावंतवाडी) ▪️💐अँड श्री. अनिल केसरकर(माजी उपजिल्हाध्यक्ष) ▪️💐अँड श्री राजू कासकर (जिल्हाध्यक्ष परिवहन सेना, सिंधुदुर्ग) ▪️💐श्री सुधीर राऊळ (उपतालुका अध्यक्ष, सावंतवाडी) ▪️💐श्री. राकेश परब(शाखाध्यक्ष- मळगांव) ▪️💐श्री. संतोष सावंतशाखाध्यक्ष- वेरले ▪️💐श्री. बाबुराव रावळ(शाखाध्यक्ष- नेमळे)…

Read More

पर्यटन व्यावसायिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेणार

केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक;मुंबई केंद्र व राज्याची संयुक्त बैठक घेण्याचे दिले आश्वासन ⚡मालवण ता.१३-:पर्यटन हा देशाचा एक मोठा व्यवसाय आहे. सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय हा येथील स्थानिक व्यावसायिकांनी स्वतःच्या हिमतीवर वाढविला असून ते कौतुकास्पद आहे. येथे मूलभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्गला केंद्र सरकारने दत्तक घेतला असल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी निश्चितच वेगळे प्रयत्न…

Read More

शिवसेनेची माळवणात हेल्पलाईन सुरू

रोजगार व करियर मार्गदर्शन करणार;युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर मालवण दि प्रतिनिधीदोन वर्षानंतर शाळा, कॉलेज सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्याबरोबर करियर मार्गदर्शन अश्या व्यापक उदेशांसह “हेल्पलाईन” सुरू करत असल्याची घोषणा युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनी केली. शिवसेना युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे…

Read More

गुळदुवे येथे वटवृक्ष रस्त्यावर कोसळला

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: सतत दोन दिवस पडणाऱ्या पहिल्याच पावसामूळे गुळदुवे (घोगळे वाडी) येथील वटवृक्षाला फटका बसला. रस्त्याच्या बाजूला असणारा वटवृक्ष आज पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर कोसळला. यामुळे वाहनधारकाना कसरत करून आपली वाहने बाहेर काढावी लागत आहेत. उशिरापर्यंत हा वटवृक्ष बाजूला केला नव्हता.

Read More
You cannot copy content of this page