१२ हजार ५०० मेट्रिक टन खत मिळणार
सिंधुदुर्गनगरी ता
जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत खरीप हंगाम २०२२ साठी सुधारित ७३३५ क्विंटल व संकरित २९० क्विंटल असे एकुण ७६२५ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली .त्यापैकी आतापर्यंत ४१९५ क्विंटल भात बियाणे प्राप्त झाले आहे.तर १७२९ क्विंटल बियाण्याची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांनी आज दिली.
जिल्हा परिषद कृषि विभागा मार्फत चालू खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना संकरित व सुधारित भात बियाणी उपलब्ध व्हावीत यासाठी महाबिज कड़े ४६९० क्विंटल सुधारित व १०० क्विंटल संकरित, खाजगी कंपनीकडे २४२५ क्विंटल सुधारित व १९० क्विंटल संकरित, तर कृषि विद्यापीठ दापोली यांच्याकडे २२० क्विंटल सुधारित अश्या एकुण ७६२५ क्विंटल भात बियन्यांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी १६८७ क्विंटल भात बियण्याची आधिक मागणी करण्यात आली आहे त्यापैकी आतापर्यंत ४१९५ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे तर त्यापैकी आतापर्यन्त १७२९ क्विंटल भात बियाण्याची विक्री झाली आहे.
गतवर्षी २०२१ खरीप हंगामासाठी महाबिज चे सुधारित २०४० क्विंटल, खाजगी कंपनी चे सुधारित ३५५० क्विंटल व संकरित १३८ क्विंटल, तसेच कृषि विद्यापीठचे सुधारित २१० क्विंटल असे एकुण ५९३८ क्विंटल भातबियाने मागविण्यात आले होते. यावर्षी कोठेही शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नये यासाठी १६८७ क्विंटल अधिक भात बियण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बियान्यांचा तुटवडा भासणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे. तालुका स्तरावर शेतकऱ्याकडून बियान्यांची खरेदी सुरु झाली आहे. आतापर्यन्त महाबिज चे २३ क्विंटल व खाजगी कंपनीचे १७०६ क्विंटल असे १७२९ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे.
खरीप हंगाम २०२२ साठी मागविण्यात आलेल्या भात बियाण्या मध्ये अंकुर सोनम, शुभांगी, प्रसन्न, जय श्रीराम गोल्ड, अंकुर रूपाली, सुवर्णा, जया, मसूरी, रोशनी, गायत्री, सारथी, सगुणा, पवनपुत्रा, अस्मिता, दिपरेखा ,रत्नगिरी, कर्जत, सहयाद्री, कोमल, मनाली, कावेरी सोना, यासह विविध संकरित व सुधारीत भात बियाण्यांचा समावेश आहे.
प्राप्त झालेल्या बियाण्यामध्ये संकरित २१२ क्विंटल, व सुधारीत ३९८३ क्विंटल बियाणे असून त्यापैकी १७२९ क्विंटल भात बियाण्याची विक्री झाली आहे.पाऊस नुकताच सुरु झाल्याने आता पेरणीला सुरुवात झाली आहे. यापुढे मोठ्या प्रमाणात बियण्याची विक्री होईल.तरी शेतकऱ्यांनी संकरित व सुधारीत बियाण्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांनी केले आहे.
सिंधुदुर्गनगरी ता
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२२ साठी एकूण १८ हजार ५६९ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती.तर १२ हजार ५०० मेट्रिक टन खत नियतन मंजूर असून आतापर्यंत ३७८० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद कृषि अधिकारी सुधीर चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी १८ हजार ५६९ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती मात्र शासनाकडून १२ हजार ५०० मेट्रिक टन खत नियतन मंजूर झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ३७८० मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. त्यामध्ये युरिया २०८७ मेट्रिक टन, डी. ए. पी. १४ मेट्रिक टन, एम् ओ पी १६७ मेट्रिक टन, ए एस पी २१०,मेट्रिक टन, सयुक्त खते ४६० मेट्रिक टन, इतर खते ८४० मेट्रिक टन अशाप्रकारे एकूण ३७८०मेट्रिक टन विविध प्रकारचे खत प्राप्त झाले आहे. उर्वरीत मंजूर नियतन खत लवकरच उपलब्ध होणार आहे. चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खताचा तूटवडा भासणार नाही. याबाबत चे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी आज दिली.
