१२ मार्च रोजी जामसंडे बाजारपेठ ठेवणार बंद :जामसंडे शहर व्यापारी संघ अध्यक्ष राजेंद्र पाटील यांची माहिती…
⚡देवगड ता.१०-:
जामसंडे शहर व्यापारी संघटनेची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत देवगड तालुक्यातील आंबा शेतकरी व आंबा बागायतदारांच्या १२ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चाला जामसंडे शहर व्यापारी संघटनेने पाठिंबा जाहीर असून जमसंडे बाजार पेठ बंद ठेवणार असल्याची माहिती जामसंडे शहर व्यापारी संघ अध्यक्ष राजेद्र पाटील यांनी दिली.
“शेतकरी समृद्ध असेल तरच आणि तरच व्यापार समृद्ध राहील” असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. आंबा शेतकरी आणि येथील व्यापारी हे एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
आज शेतकरी संकटात असेल तर व्यापार उद्योग समृद्ध होऊ शकत नाही. देवगड परिसरातील संपूर्ण अर्थकारण हे आंबा व काजू शेतकऱ्यांवर अवलंबून असल्याने त्यांच्यावर आलेल्या अडचणींचा परिणाम थेट व्यापारावर होत असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यापार व उद्योगांवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला व्यापाऱ्यांनी एकजुटीने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव शरद लाड, उपाध्यक्ष अनिकेत पेडणेकर, भारत माने, विनोद पटेल, बाबू लाड, उमेश कुळकर्णी, विजय पाटील, प्रल्हाद शेडगे, सुधीर तांबे, बंडू लाड, संतोष नलावडे, शेखर वालकर, रुपेश नवलु, सुधीर आचरेकर आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
१२ मार्चला ओरस येथे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला जामसंडे बाजारपेठ बंद ठेवणार याबाबत पत्रकारांना माहिती देताना जामसंडे शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेद्र पाटील
