वेंगुर्ला तुळस येथे गवारेड्यांच्या धडकेत दोन वाहनांचे नुकसान ; चौघे जखमी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तुळसमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांवर सोमवारी 9 मार्च रोजी रात्री शिवाजी हायस्कुल तुळस नजिक मुख्य रस्त्यावर गवारेड्यांच्या कळपाने धडक दिल्याने रिक्षा व ओमनी यांचे नुकसान झाले आहे. तर दोन्ही वाहनातील एकूण चारजण जखमी झाले आहेत. दरम्यान याबाबत वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून नुकसानभरपाई बाबत प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर आपल्याकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
वेंगुर्ला पाटीलवाडा येथील रिक्षाचालक गोविंद रामचंद्र जाधव (52) व त्यांची मुलगी
धनश्री गोविंद जाधव (18) हे रिक्षाने (क्र. MH 07 स 6150) सावंतवाडी मळगाव रेल्वेस्टेशन येथून वेंगुर्ला येथे येत होते. तर याच मार्गांवरून वेंगुर्लाहुन सोनुर्लीकडे ओमनी (क्र. MH 07 Q 6667) जात होती. यामधील लक्ष्मण राम जाधव (वर्ष 31) व
रामा लक्ष्मण जाधव (वय 65) दोघे रा.सोनुर्ली, ता. सावंतवाडी हे वेंगुर्लातुन सोनुर्लीकडे जात होते. यावेळी येथून जाणाऱ्या गवारेड्यांच्या कळपाने रस्ता क्रॉस करून जात असताना झालेल्या झुंजीवेळी दोन्ही वाहनाना जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. तर दोन्ही वाहनातील 4 जण जखमी झाले. यावेळी तुळस – मातोंड भागातील स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित जखमीना तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. तर सोनुर्ली येथील जखमी दोघांना डोक्याला दुखापत झाल्याने सावंतवाडी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.

You cannot copy content of this page