“स्त्रीला ‘माणूस’ म्हणून समान संधी द्या; तिच्या सन्मानातूनच राष्ट्राचा विकास”-: साहित्यिका वृंदा कांबळी…

⚡मालवण ता.१०-: ज्या देशात स्त्रीचा सन्मान होतो, त्या देशाचा विकास होतो. आजही शिक्षण, करिअर, विवाह किंवा वैयक्तिक निर्णय या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला स्वतःच्या इच्छेपेक्षा समाजाच्या अपेक्षेनुसार जगावं लागतं. तिला सामाजिक बंधनांमध्ये जखडून न ठेवता “माणूस” म्हणून जगण्याची समान संधी दिली पाहिजे. स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे. मातृत्व, प्रेम, करुणा त्याग या गुणांनी ती कुटुंबाला जोडून ठेवते, असे प्रतिपादन साहित्यिका, कथा लेखिका सौ वृंदा कांबळी यांनी कट्टा येथे बोलताना केले

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा व डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा चा महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालय सिंधुदुर्ग, सखी वन्स स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने महिला दिन साजरा करण्यात आला
याप्रसंगी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक सहसचिव साबाजी गावडे, वराडकर हायस्कूल कट्टाचे. स्कूल कमिटी चेअरमन सुधिर वराडकर, सौ श्रद्धा नाईक, प्रमुख वक्त्या, वराडकर हायस्कूल कट्टा च्या मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. देवयानी गावडे, ॲड. रूपाली प्रभू, राज गोविंद मडावी, महेंद्र जाधव, दिपिका सावंत, मेघा वजराटकर, कट्टा इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका सौ वैदही शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सौ. विणा शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले

यावेळी साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल साहित्यिका सौ. कांबळी यांचा संस्था सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी स्त्रियांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आहे, पण त्यासाठी तिने स्वतः अनेक तणावांचा सामना करताना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर असणे गरजेचे असल्याचे सांगितले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी स्त्री ही शिक्षण व रोजगारामुळे स्वावलंबी होईल, त्यामुळे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवण्याबरोबरच महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आजचा दिवस असल्याचे सांगितले

यावेळी ॲड. रूपाली प्रभू, स्मिता कंम्प्युटर कट्टाच्या संचालिका सौ श्रद्धा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सौ. श्रद्धा नाईक, सौ. श्रद्धा मुसळे सौ. दक्षता भोजणे, सौ. शुभलक्ष्मी नांदोस्कर, श्रीमती. रेश्मा जांभवडेकर, सौ. करीना शेख, गुरामवाडी ग्रा पं सदस्या सौ. मयुरी कुबल यांचा गौरव शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कांचन खानोलकर व आभार प्रदर्शन प्रा. श्रुती कुंभार यांनी केले.

You cannot copy content of this page