राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत भरतगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी…

⚡मालवण ता.१०-:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मसुरे देऊळवाडा येथील भरतगड हायस्कूल नंबर २ चे विद्यार्थी कुमारी दुर्वा प्रसाद परब हिने ७८ गुण आणि कुमार स्वराज समीर बागवे ७३ गुण मिळवीत प्राप्त करीत घवघवीत यश प्राप्त केले

या त्यांच्या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या परीश्रमाचा निश्चित असा ठसा उमटला आहे.
शिक्षकांनी नेमून दिलेल्या अभ्यासाच्या वेळेचे नियोजन, मार्गदर्शन वर्ग, सराव चाचण्या आणि विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास या योग्य ताळमेळामुळेच यश निश्चित झाले आहे. मार्गदर्शक प्रभारी मुख्याध्यापक श्री एस. आर. कांबळे, श्री एस. बी. चौगले , श्रीमती एस.एस. मसुरेकर , श्रीमती ए. ए. शेर्लेकर यांनी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करून या विद्यार्थ्यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शाळा समिती अध्यक्ष अरुण बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, माजी अध्यक्ष महेश बागवे, मुंबई कमिटी अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण मुळीक परब, संस्थेचे सर्व सभासद यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page