सिंधुदुर्गनगरी ता
सामाजिक वनीकरण विभागाकडून हायवे दुतर्फा वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ कसाल येथून करण्यात आला.
सामाजिक वनीकरण कुडाळ विभागाच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून वृक्ष लागवड मोहिमेस कसाल येथून सुरुवात करण्यात आली.यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल श्री सातपुते,वनपाल सुनील सावंत,मनसेचे सचिव राजेश टंगसाळी,अब्राव फर्नांडिस आदी उपस्थित होते.जिल्हावासीयांनी देखील पावसाच्या सुरुवातीला जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी व पर्यावरण संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन वनक्षेत्रपाल सातपुते यांनी यावेळी केले आहे.
