विद्यार्थ्यांनी संगीता पांचाळ यांच्या कडून जाणून घेतला यशस्वी उद्योजिका होण्याचा राजमार्ग..
⚡सावंतवाडी ता.१०-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या खास कार्यक्रमासाठी आरोस दांडेली ( कोंडुरे तिठा) येथील महिला उद्योजक संगीता राम पांचाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.
यावेळी प्रशालेच्या वतीने संगीता पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला.प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांच्या जीवनावर गौरवपर भाषण केली.
प्रशालेच्या शिक्षिका देवयानी चव्हाण व विद्यार्थ्यांनी संगीता पांचाळ यांची खास मुलाखत घेऊन त्यांचा जीवनातील प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी पांचाळ यांनी सुद्धा आपल्या जीवनातील चड उतार कथन करत उपस्थितांना जीवनात कुठल्याही संकटाला न घाबरता अगदी मोठ्या धैर्याने संकटना सामोरे जायला हवे. यश आपलच आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मिताली नाईक,कृपा नेमळेकर,प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी चव्हाण तर आभार मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी मानले
