क्रिकेटच्या मैदानावर माजी सैनिक आणि गुरुजनांचा होणार सन्मान…

⚡दोडामार्ग ता.१०-: असं म्हटलं जातं, गुरुवीण जगी थोर कोण ? तर आज आपण सुरक्षित जीवन जगत आहे ते भारतीय सैन्य दलामुळे. क्रिकेट म्हणजे केवळ मौज मजा नाही तर त्यातून सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे. आपल्या जीवनात गुरु आणि भारतीय सैनिक यांचे महत्व लक्षात घेऊन गुरुजन आणि माजी सैनिक यांचा सत्कार करण्याचे ‘भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टा , पर्व ११वे ‘ च्या कमिटीने ठरविले आहे. शुक्रवार दि.१३ मार्च पासून सुरु होणारे हे लीग रविवार दि. १५ मार्च पर्यंत राहणार असून तीन दिवसात उपस्थितीनुसार हे सत्कार केले जातील असे कमिटीने सांगितले.
‘भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टा ‘ ची कमिटी क्रिकेटकडे केवळ खेळ म्हणून न पाहता सांघिक भावना जोपासण्याचे काम करते त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी असतात शिवाय इथे खेळाडूंना असणारी बक्षिसे ही चषकापुरती मर्यादित नसतात तर लाकडी खाट , कपाट, फॅन, सोफासेट, टीव्ही कॉर्नर, आराम खुर्ची,लाकडी दिवाण अशा अनेक गृहपयोगी वस्तू असतात. त्यामुळे अनेकांचे लक्ष या स्पर्धेकडे असते.

You cannot copy content of this page