पी एम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेकडून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान…

⚡वैभववाडी ता.१०-: जागतिक महिला दिनानिमित्त पी एम श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
यावेळी वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर केंद्रप्रमुख विजय केळकर, रामचंद्र जाधव व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस साळुंखे उपाध्यक्ष सौ दळवी सदस्य तथा पत्रकार संजय शेळके मुख्याध्यापक दिनकर केळकर विद्या गुरखे अविनाश आवटे अहिल्या लांडगे रेखा धावले. आदी पालक विद्यार्थी उपस्थित होते.
पीएमसी दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान आठ महिलांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये राजकीय क्षेत्रातून वैभववाडी तालुक्याच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे वैभववाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस प्रीती शिंगारे शिक्षण क्षेत्रातून शितल पाटील सामाजिक क्षेत्रातून व्यसनमुक्तीवर प्रबोधन करणाऱ्या व नुकतेच अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळालेल्या श्रावणी मदभावे, महिला बालकल्याण विभागातून राज्यात प्रथम आलेल्या वैभववाडी केंद्राच्या विद्या गुरखे आरोग्य क्षेत्रातून सौ डॉ झावरे मॅडम कृषी शिक्षण क्षेत्रातून कृषी तंत्र विद्यालय सांगुळवाडीच्या शिक्षिका सपना गराटे (वारंग) तर ग्रामीण रुग्णालय वैभवाडीच्या आरोग्य सेविका रेखा जाधव यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महिला पालकांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले पाककला स्पर्धा 1. मानसी साखरपेकर 2. कशिश जंगम 3. सावित्री पाकले
संगीत खुर्ची कशीश विश्वास जंगम,गौतमी राजेश कळसुलकर
रेखा राजू जाधव
वेशभूषा
1.गौतमी राजेश कळसुलकर

  1. कशीश विश्वास जंगम
  2. प्राची प्रवीण सावंत या विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका रेखा धावले यांनी केले.
You cannot copy content of this page