शिवसेनेची माळवणात हेल्पलाईन सुरू

रोजगार व करियर मार्गदर्शन करणार;युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर

मालवण दि प्रतिनिधी
दोन वर्षानंतर शाळा, कॉलेज सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्याबरोबर करियर मार्गदर्शन अश्या व्यापक उदेशांसह “हेल्पलाईन” सुरू करत असल्याची घोषणा युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनी केली.

शिवसेना युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मालवणात युवासेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात पर्यावरण पूरक उपक्रमसह साजरा करण्यात आला. या निमित्ताने हेल्पलाईन सुविधा विध्यार्थी युवक यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे. याबाबत मंदार ओरसकर यांनी माहिती दिली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, उपशहर प्रमुख किसन यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, सन्मेष परब, यशवंत गावकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, माजी नगरसेवक पंकज सादये, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अमेय देसाई, चंदू खोबरेकर, बाळू नाटेकर, मनोज मोंडकर, समीर लब्दे, नंदा सारंग निनाक्षी शिंदे, बाबा मडये, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.

हेल्पलाईनची घोषणा यावेळी युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनी केली. यावेळी ते म्हणाले, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री पद सांभाळताना आपले नेतृत्व गुण सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करताना पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मागील दोन वर्षे शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. ही हेल्पलाईन २४ तास कार्यान्वित राहील. यामध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्यात येणार आहेत. त्याच बरोबर युवकांना स्वयंरोजगार करताना निर्माण होणाऱ्या अडचणींची देखील सोडवणूक करताना त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे श्री. ओरसकर म्हणाले. यावेळी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले असून स्वयंरोजगार करताना निर्माण होणाऱ्या अडचणींची देखील सोडवणूक करताना त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे श्री. ओरसकर म्हणाले. यावेळी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले असून मंदार ओरसकर- ८२७५५५७७८८, निनाक्षी शिंदे – ९३२५९४१७९८ , शिल्पा खोत ९३२६४७७७०७, सिद्धेश मांजरेकर – ७०२१९८११८० , दत्ता पोईपकर- ९४०५६१९८७९ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा

You cannot copy content of this page