⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित सभापती शंकर घारे व नवनिर्वाचित उपसभापती सचिन देसाई व सर्व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आप्पी फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, अन्य नवनिर्वाचित सदस्य, माजी पंचायत समिती सभापती यशवंत उर्फ बाळू परब, माजी सभापती सुनील मोरजकर, माजी उपसभापती सिद्धेश परब, तालुका संघटक बाळा दळवी, शहर पदाधिकारी अजित राऊळ, कोचरा सरपंच योगेश तेली, कौशिक परब, काशिनाथ नार्वेकर, उमेश नाईक, संदीप पेडणेकर, मितेश परब, अण्णा वजराटकर आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित सभापती- उपसभापती यांचा सन्मान…
