सोनुर्ली बसफेऱ्यांच्या अनियमिततेवर ग्रामस्थ संतप्त; आंदोलनाचा इशारा…

⚡सावंतवाडी ता.०९-:
सोनुर्ली गावासाठी सोडण्यात येणाऱ्या बस फेऱ्या वेळेत येत नसल्याने प्रवासी वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे या बस फेऱ्या वेळेत सोडाव्यात अन्यथा हा ग्रामस्थ प्रवासी व विद्यार्थ्यांना घेऊन सावंतवाडी बस स्थानकात आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे.
सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी एसटी बस स्थानकातून सकाळी सव्वा सहा त्यानंतर सव्वा नऊ, सव्वा अकरा, सव्वादोन व सव्वा पाच अशा बसलेल्या सोडण्यात येतात गेले काही वर्षापासून या बस पेरायच्या वेळेत अनियमता दिसून येत आहे वेळोवेळी यासंदर्भात एसटी प्रशासनाचे लक्ष वेदण्यात आले मात्र प्रशासनाकडून तात्पुरते आश्वासन देऊन आणि तात्पुरत्या वेळेत सोडून ग्रामस्थांची दिशाभूल केली जाते एका बाजूला असल्याने एसटी प्रवाशांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना बस वेळेत न आल्यास प्रवासासाठी चार ते पाच किलोमीटर न्हावेली सारख्या ठिकाणी यावे लागते. यामध्ये आर्थिक नुकसानी आणि शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसानी होते अलीकडेच या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने एसटी प्रशासनाला पत्र देऊन या बस फेऱ्या वेळेत सोडण्याची मागणी केली आहे परंतु या बस्पिऱ्या वेळेत सोडत नसल्याने याचा परिणाम एसटी प्रवासी वर्ग व विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना सोसावा लागतो त्यामुळे या बसलेल्या तात्काळ वेळेवर सोडण्यात याव्यात अन्यथा प्रवासी वर्ग शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन बस स्थानकामध्ये ती आंदोलन सोडावे लागेल असा इशारा उपसरपंच श्री गावकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page