⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे मातोंड पंचायत समिती सदस्य शंकर शशिकांत घारे यांची आज बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांनी तुळस ग्रामदैवत श्री देव जैतिराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच त्यांनी पेंडूर श्री देव घोडेमुख, मातोंड श्री देवी सातेरी, पाल श्री भूमिकादेवी, पाल श्री खाजणादेवी तसेच होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर चे दर्शन घेतले. यावेळी होडावडा उपसरपंच राजबा सावंत, माजी पंचायत समिती सभापती शिवसेनेचे यशवंत उर्फ बाळू परब, रामचंद्र परब, होडावडा माजी सरपंच तथा मानकरी प्रसाद दळवी, होडावडा भाजपचे मनोहर नाईक, पेंडूर सरपंच संतोष गावडे, पाल सरपंचा कावेरी गावडे, तुळस उपसरपंच सचिन नाईक, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, मातोंड ग्रा. पं. सदस्य दिपेश परब, संतोष राऊळ, जयवंत तुळसकर, अन्य ग्रामस्थ तसेच मातोंड, पेंडूर, तुळस, होडावडा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सभापती शंकर घारे यांचा होडावडा श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे तुळस व मातोंड पंचायत समिती मतदारसंघात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे यांनी घेतले तुळस ग्रामदैवत श्री देव जैतिराचे दर्शन…
