Headlines

किनळे माऊली सातेरी मंदिरातील घंटा चोरीस

आरोंदा पोलिसांत तक्रार ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: सध्या सावंतवाडी शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असतानाच, सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील श्री देवी माऊली सातेरी मंदिरातील घंटा चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे, याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थ मंदिरात गेले असता , ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ आरोंदा पोलिस ठाण्याला याबाबत कळवून तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस…

Read More

रामेश्वर वाचन मंदिरास प्रिंटर भेट

⚡मालवण ता.२४-: वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमी झटणाऱ्या आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर या संस्थेची तातडीची गरज ओळखून आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामिण बिगरशेती या समाजाभिमूख उपक्रमात अग्रेसर असलेल्या पतसंस्थेकडून झेरॉक्स मशीन सहित प्रिंटर भेट म्हणून दिला आहे. सदर प्रिंटर पतसंस्थेचे चेअरमन आणि रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, व्हाईस चेअरमन सुरेश हडकर…

Read More

अंमली पदार्थांविरोधात शाळा, महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा

अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: अंमली पदार्थांविरोधात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, अभियान असे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. त्यांच्या दुष्परिणामांची माहिती सर्वत्र पोहचवावी, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिले. जिल्हा पातळीवर अंमली पदार्थांचे सेवन व वापराविषयी परिणामकारक प्रतिबंधासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची ऑनलाईन बैठक आज झाली. याबैठकीस…

Read More

राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेसाठी मोठी चुरस

१५ जागांसाठी ३७ अर्ज दाखल ओरोस ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. २३ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. एकूण ३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १५ जागांसाठी ३७ अर्ज आल्याने यावर्षी राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांतील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. जिल्हा सहकारी संस्था…

Read More

भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना सत्तेत आली होती

पुन्हा भाजपची सत्ता येवून फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी कोकणची ईच्छा:म्हणूनच यज्ञ केल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्रात जी आज राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ती यापूर्वीच निर्माण होणार होती. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी कोकणातील जनतेची इच्छा असून, त्यासाठी…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदार संघ हरकती फेटाळल्या

केवळ चार हरकती मान्य सिंधुदुर्गनगरी ता २४जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचनेबाबत प्राप्त झालेल्या ४० हरकती तून ३६ हरकती कोकण आयुक्तानी फेटाळल्या आहेत तर मतदार संघाच्या नावात बदल व वाड्या जोडण्याच्या ४ हरकती मान्य केल्या आहेत. आता अंतिम प्रभाग रचना २७ जूनला जाहीर केली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हा परिषद…

Read More

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरसरीत कमी

सिंधुदुर्गनगरी ता २३सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ५९४.५१ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी २३ जून पर्यंत सरासरी ९४६.५१ मिलीमीटर तर यावर्षी केवळ ३५२ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे. यावर्षी पाऊसाला योग्यवेळी सुरुवात झाली असली असली तरी गतवर्षीपेक्षा यावर्षी पाउसाचे प्रमाण कमालीचे कमी राहिले आहे.गतवर्षी २३ जून पर्यंत सरासरी…

Read More

निराधार योजनेची ४२ प्रकरणे मंजूर

⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयात २३ जून रोजी पार पडलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या मासिक बैठकीत निराधार योजनेची एकूण ४२ प्रकरणे मंजूर करण्यात आली.

Read More

माणगाव येथे काँग्रेसच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार…

⚡कुडाळ ता.२४-: माणगांव येथे कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व माणगांव खोरे विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाग्यलक्ष्मी हॉल माणगांव मध्ये आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमचे आयोजन कु. गोविंद उत्तम कुंभार (उपाध्यक्ष युवक काँग्रेस, कुडाळ ) यांनी केले होते. यामध्ये कु. मानसी विजय कुडाळकर, मयुरी महेश घाडी, सुमित मिलींद…

Read More

सहाय्यक योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या “त्या” स्ट्रीट लाईट बाबत सविस्तर माहिती द्या…

माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी… देवगडदेवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीत सन २०१९ ते २०२२ या कालावधीत सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाइट बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.या पत्रात नमूद केल्या प्रमाणे २१ जून रोजी नगरपंचायतीच्या…

Read More
You cannot copy content of this page