माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी…
देवगड
देवगड जामसंडे नगर पंचायत हद्दीत सन २०१९ ते २०२२ या कालावधीत सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाइट बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी मुख्याधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात नमूद केल्या प्रमाणे २१ जून रोजी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मधील विषयांची विषयांची चर्चेनुसार प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध वृत्त सन २०१९ ते सन २०२२ पर्यंतच्या कालावधीत सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत स्ट्रीट लाईट पोल उभारणी कोणत्या ठिकाणी किती उभारण्यात करण्यात आले. स्पॅन कशा प्रकारे उभारणी करण्यात आली याची माहिती देण्यात यावी तसेच या कामाची बिले कधी अदा करण्यात आली. त्याची व्हॉचरस सह माहिती देण्यात यावी. जेणेकरून तत्कालीन नगराध्यक्षा म्हणून आपल्याला याची शहानिशा करता येईल असे या पत्रात नमूद केले आहे.
