आरोंदा पोलिसांत तक्रार
⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: सध्या सावंतवाडी शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असतानाच, सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील श्री देवी माऊली सातेरी मंदिरातील घंटा चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे, याबाबत येथील स्थानिक ग्रामस्थ मंदिरात गेले असता , ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ आरोंदा पोलिस ठाण्याला याबाबत कळवून तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. जर कोणी व्यक्ती संशयास्पद फिरत असेल किंवा ह्या घंटा विकत असेल तर त्वरित पोलीस ठाण्याला किंवा ग्रामस्थांना याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
