आदी राजीनामा द्या मगच मंत्री आणि पालकमंत्री पदाची स्वप्ने बघा…

शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांची आम. केसरकर यांच्यावर घणाघाती टीका…

⚡सावंतवाडी ता.२४-: नेहमी तत्त्वांची भाषा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी शिवसेनेसोबत विश्वासघात करणे हे हिंदुत्वात बसत नाही, मुळात हिंदू धर्मात विश्वासघातकी मंडळीना थारा नाही, त्यामुळे केसरकर यांनी राजीनामा द्यावा व धनुष्यबाण या निशाणी शिवाय दुसऱ्या कुठल्याही निशाणी वर निवडणूक लढवून जिंकून दाखवावे मग काय ती मंत्री आणि पालकमंत्री बनण्याची स्वप्ने बघावीत अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केली.आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेसोबत फारकत घेत शिंदे गटात सामील झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे शिवसैनिका मधून विविध प्रतिक्रिया उमटत असून केसरकर यांच्या राजीनाम्याची ही मागणी होत आहे.डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनीही पत्रक प्रसिद्ध दिले असून त्यात त्यांनीही केरसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

श्री परुळेकर यांनी दिलेल्या पत्रकात असे म्हटले की, सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांनी आमदार दीपक केसरकर यांना मोठ्या विश्वासाने धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून निवडून दिले आहे, त्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी येथील मतदार जनतेचा विश्वासघात करू नये मुळात विश्वास घात करणे हे हिंदुत्वात बसत नाही, आणि अशा लोकांना हिंदू धर्मात थारा नाही खरं तर नेहमी तत्त्वाची भाषा करणाऱ्या केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पोट निवडणुकीला सामोरे जावे, त्याने धनुष्य बाना शिवाय दुसऱ्या कुठल्याही चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी आणि मगच काही मंत्री आणि पालकमंत्री बनण्याची स्वप्न बघावी खरा कौल येथील जनता देईल. एकूणच जिल्ह्यात सर्वत्र केसरकर यांच्या विरोधात शिवसैनिका मधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page