शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ राहीलेल्या आम.वैभव नाईक यांचा केला सत्कार
⚡कणकवली ता.२४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपसमोर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख झुकले नाहीत. त्यामुळे मी
शिवसेनेवर निष्ठा ठेवेन ही भूमिका प्रत्येक शिवसैनिकांनी घेतली पाहिजे. यापुढील काळात तुम्हा-आम्हावर कारवाई होईल, संघर्ष करावा लागेल, त्यासाठी आपण शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे सज्ज राहिले पाहिजे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया, असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे आम. वैभव नाईक यांनी केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अखंड महाराष्ट्रात शिवसेनेत वादळ उठले आहे. सिंधुदुर्गातील शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी आले. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांनी घेतली. भाजपचा सत्तेचा घास हिरावून गेल्यामुळे भाजपचे नेतेमंडळी अस्वस्थ होती. या अस्वस्थतेतून केंद्रीय यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीतील मंत्री व मुख्यमंत्र्यांना मागील अडीच वर्षे टार्गेट केले. मात्र, मुख्यमंत्री कोणासमोर झुकले नाही,
त्यामुळे आपण सर्वांनी शिवसेनेच्या बिकट काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया आणि गद्दार आणि पदासाठी शिवसेनेवरील निष्ठा गाहाण ठेवणार्यांना आगामी काळात धडा शिकवूया, असे आवाहन नाईक यांनी शिवसैनिकांना केले.
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीसमोर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले होते. त्यावेळी राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी 80 वर्षांच्या एकावृद्धेने शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे राणा दाम्पत्याला मातोश्रीवर येण्यापासून रोखले होते. त्या महिलेल्या शिवसेनेने काहीच दिले नाही, पण तिची शिवसेनेवरील निष्ठा कायम आहे. तुम्हा शिवसैनिकांमुळे मी आमदार झालो, त्याचा मला अभिमान असून सत्तेसाठी आणि मंत्रीपदाच्या लालसेसाठी कुणी शिवसैनिक पक्षावरील निष्ठा सोडून जाणार असेल तर त्यांनी खुशाल जावे, भविष्यात त्यांना शिवसैनिक व जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी बंडखोरांना दिला.
केली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत,
नगरसेवक सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव,रामदास विखाळे, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, नगरसेविका मानसी मुंज, बाळू मेस्त्री, कन्हैया पारकर, सचिन सावंत, राजू राठोड, रिमेश चव्हाण, तेजस राणे, सोहम वाळके,गोट्या कोळसुलकर, शंकर पार्सेकर, सरपंच प्रमोद कावले,अजित काणेकर, शहर प्रमुख शेखर राणे, निसार शेख,अनिल हळदिवे आदि बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी
उपस्थित होते. यावेळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शिवसैनिकांनी रॅली
काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार आमदार वैभव नाईक यांनी अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान शिवसैनिकांनीही जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली.
