रामेश्वर वाचन मंदिरास प्रिंटर भेट

⚡मालवण ता.२४-: वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमी झटणाऱ्या आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर या संस्थेची तातडीची गरज ओळखून आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामिण बिगरशेती या समाजाभिमूख उपक्रमात अग्रेसर असलेल्या पतसंस्थेकडून झेरॉक्स मशीन सहित प्रिंटर भेट म्हणून दिला आहे. सदर प्रिंटर पतसंस्थेचे चेअरमन आणि रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, व्हाईस चेअरमन सुरेश हडकर यांच्या हस्ते वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी वाचनालयाचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाह उर्मिला सांबारी, अशोक कांबळी, विरेंद्र पुजारे, भिकाजी कदम, पतसंस्थेचे अभिजित जोशी, सांस्कृतिक समितीचे कामीनी ढेकणे, भावना मुणगेकर, रुपेश साटम, नरेंद्र कोदे, विलास आचरेकर,ग्रंथपाल विनिता कांबळी कर्मचारी महेश बापर्डेकर, सम्रूद्धी मेस्त्री, स्वप्निल चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page