सिंधुदुर्गनगरी ता २३
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी ५९४.५१ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी २३ जून पर्यंत सरासरी ९४६.५१ मिलीमीटर तर यावर्षी केवळ ३५२ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे.
यावर्षी पाऊसाला योग्यवेळी सुरुवात झाली असली असली तरी गतवर्षीपेक्षा यावर्षी पाउसाचे प्रमाण कमालीचे कमी राहिले आहे.गतवर्षी २३ जून पर्यंत सरासरी ९४६.५१ मिलीमीटर पाऊस झाला होता तर यावर्षी २३ जून पर्यंत केवळ सरासरी ३५२ मिलीमीटर एवढाच पाऊस झाला आहे . गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत सरासरी ५९४.५१ मिलीमीटर एवढा पाऊस कमी पडला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्तापन विभागाच्या अहवाला वरुन स्पस्ट झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ५०.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ३६.१ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ३५२.० मि.मी. पाऊस झाला आहे.
देवगड तालुक्यात -१८.०(३४३.६),मि मी, मालवण -४४.१(३५३.४), मि मी, सावंतवाडी-३५.४ (४२३.७), मि मी, वेंगुर्ला-५०.७(३६९.३) मि मी कणकवली-३८.७ (२९६.२),मि मी, कुडाळ-४३.०(३५४.४),वैभववाडी-२५.३(३३६.०), मि.मी,
दोडामार्ग-२३.३(३४६.९), मिलीमीटर असा पाऊस झाला आहे. यावर्षीचे पाउसाचे प्रमाण पहाता भात लागवडीचे काम लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
