⚡सावंतवाडी, ता. १८-: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, नगरसेवक देव्या सुर्याजी, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांसाठी मोलाचे योगदान दिले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.
