⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी केक कापून आमदार केसरकर यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षरोपण करण्यात आले.पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
