भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना सत्तेत आली होती

पुन्हा भाजपची सत्ता येवून फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी कोकणची ईच्छा:म्हणूनच यज्ञ केल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्रात जी आज राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ती यापूर्वीच निर्माण होणार होती. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी कोकणातील जनतेची इच्छा असून, त्यासाठी जिल्हा भाजपकडून आज सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात यज्ञ याग करण्यात आला आहे. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, बंडखोरी केलेले आमदार महाराष्ट्रात विकासाला खीळ बसली असल्याचे स्वतः सांगत असून, योग्य तो निधी मिळत नसल्याने महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक परिमल नाईक माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी,माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर माजी नगरसेव उदय नाई,माजी नगरसेवीका दिपाली भालेकर,माजी नगरसेवीका उत्कर्षा सासोलकर, सविता टोपले,मिस्भा शेख,शितल गोंदावळे, पंढरीनाथ राऊळ,संजू शिरोडकर, परीक्षित मांजरेकर,विनोद सावंत दिलीप भालेकर,बंटी पुरोहित,केतन आजगांवकर,अजय सावंत, अनिल सावंत पिंट्या सावंत, बंटी जामदार, गणेश कुडव, नितीन गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page