Headlines

इंधन दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात
१ ऑगस्ट रोजी रिक्षा टॅक्सी बंद आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचा इशारा ⚡कणकवली ता.२५-: सी.एन.जी.गॅस,पेट्रोल,डिझेल इंधन यांच्या भरमसाठ दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑगस्ट पासून रिक्षा टॅक्सी बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहे. गेंड्यांच्या कातडीचे पांघरूण घेतलेल्या प्रशासनाला जागे करून…

Read More

आंबोली येथे पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे सुयोग्य नियोजन

पर्यटकांनाही वर्षा पर्यटनाचा सुरळीतपणे लुटता आला आनंद आंबोली । प्रतिनिधी : बेधुंद पर्यटकांमुळे वर्षा पर्यटनावेळी आंबोलीत होणारी ट्रॅफिक व घिसाडगर्दी यावर अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सुयोग्य नियोजन करूनआळा बसविल्याने रविवारी आंबोलीत पर्यटकांनाही वर्षा पर्यटनाचा आनंद सुरळीतपणे लुटता आला. वर्षा पर्यटनामुळे जगप्रसिद्ध झालेल्या आंबोली पर्यटन स्थळाला बेधुंद व नशाबाज पर्यटकांमुळे…

Read More

बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कारणे दाखवा नोटीस

दांडी व तळाशील येथील मच्छीमारांचा समावेश मालवण (प्रतिनिधी) मासेमारी बंदी कालावधी उठण्यास काही दिवसांचा अवधी असतानाच गेला आठवडाभर मालवणच्या मच्छि बाजारात मोरी, सुरमई, बांगडा अशी किमती मासळी मोठ्या प्रमाणावर विक्रीस येऊ लागली आहे. मासेमारी बंदी कालावधी असताना ही मासळी विक्रीस आल्यानंतर सुशेगात असलेल्या मत्स्य विभागाला उशिराने का होईना जाग आली असून नौकांवर आऊट बोर्ड लावण्याच्या…

Read More

पुन्हा पर्यटकांची कार वाळूत रुतली

धुण्यासाठी समुद्रात नेलेली कार बाहेर काढताना पर्यटकाचे आले नाकेनऊ ⚡मालवण ता.२४-: मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर अतिउत्साही पर्यटकांच्या गाड्या समुद्राच्या पाण्यात अडकण्याचा सिलसिला सुरूच असून दोन दिवसांपूर्वी पर्यटकांनी किनाऱ्यावर कार चालवून स्टंटबाजी केल्याची घटना ताजी असताना आज पर्यटकांनी कार धुण्यासाठी ती थेट समुद्राच्या पाण्यात नेण्याचा पराक्रम केला. कार धुताना ती पाण्यात वाळूत रुतल्याने कार बाहेर काढणे त्या…

Read More

घराघरात हिंदू सैनिक निर्माण होणे आवश्यक

हिंदु जनजागृती सभेत डॉ. दिघे यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.२४-: अग्निपथ योजनेत समस्त हिंदू युवक सहभागी झाल्यास घराघरात हिंदुं सैनिक निर्माण होतील. देशात आज काही ठराविक शक्तिंकडून अग्निपथ सारख्या चांगल्या योजनांना विरोध दर्शविला जात आहे. हिंदु फक्त आरत्या आणि भजनातच गुंतला जावा, असे यामागचे षडयंत्र आहे. देश आणि धर्मावरील आक्रमण जर थांबवायचे असेल तर समस्त हिंदूंनी…

Read More

यापुढे मराठा समाजातील मुलांचे शिक्षण थांबणार नाही

हिंद मराठा महासंघ राहणार नेहमी पाठीशी;जिल्हाध्यक्ष विशाल परब यांची ग्वाही ⚡वैभववाडी ता.२४ संजय शेळके-: समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी हिंद मराठा महासंघ सदैव आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची जबाबदारी आम्हा मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. सर्वांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्वल करावे असे…

Read More

सावंतवाडी येथील स्वामी समर्थ केंद्रात वृक्षारोपण…

⚡सावंतवाडी ता.२४-: दिंडोरी प्रणित सावंतवाडी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परिसरात सिद्धिविनायक फ्लावर्स नर्सरीच्या कांचन कदम यांच्या सहकार्याने आज विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री उत्तम जाधव, श्री राऊळ सर, श्री खडपकर, श्री गवस, सौ. खडपकर आदी सेवेकरी उपस्थित होते.

Read More

ओम नारकर यांची राज्यस्तरीय फुटबॉल संघात निवड

२१ वर्षाखालील संघातून राज्याचे करणार नेतृत्व वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावात नेहमीच समाजसेवेत सतत पुढे असणारे समाजसेवक ,उद्योजक हनुमंत नारकर यांचे सुपुञ ओम हनुमंत नारकर याची बेंगलोर येथे अंडर २१ वयोगटातील राज्यस्तरीय फुटबाॅल संघांत नुकतीच निवड झाली आहे.यामुळे त्याचे वैभववाडी तालुक्यात सर्वञ अभिनंदन केले जात आहे. गेले दोन दिवसापुर्वीच त्यांची राज्यस्तरीय फुटबाॅल अंडर २१…

Read More

नाधवडे सरदार माध्यमिक विद्यालय येथे मोफत गणवेश वाटप

वैभववाडी प्रतिनिधी नाधवडे गावात सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे येथे सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. नाधवडे गावात सतत सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण )…

Read More

सरदार माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

वैभववाडी प्रतिनिधी नाधवडे गावात सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे येथे सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. नाधवडे गावात सतत सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण )…

Read More
You cannot copy content of this page