साळीस्ते येथील अंशिता ताम्हणकर हीची टेबल टेनिसच्या मुंबई संघ कर्णधारपदी निवड
१९ वर्षाखालील चॅम्पियन स्पर्धेत करणार नेतृत्व ⚡देवगड ता.१३-: कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील १५ वर्षीय अंशिता अशोक ताम्हणकर हिची १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. पुणे येथे होणार्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ती मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या तिच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. मुळची कणकवली…
