Headlines

पिंगुळी ‘तंटामुक्ती’ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भगवान रणसिंग यांची बाजी

कुडाळ : पिंगुळी गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत भगवान रणसिंग हे विजयी झाले त्यांना ६५ मते मिळाली. त्यानी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक धुरी यांचा पराभव केला.
ग्रामपंचायत पिंगुळीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड असल्याने अध्यक्ष पदासाठी भगवान रणसिंग व दीपक धुरी अध्यक्षपदासाठी उभे राहिले असता सभा अध्यक्षानी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार निवडणूक घेण्यात आली. एकूण ११२ ग्रामस्थानी मतदान केले. त्यापैकी भगवान रणसिंग यांना ६५ मते तर दीपक धुरी यांना ३४ मते मिळाली. तसेच १३ नोटा मतदान झाले. भगवान रणसिंग हे ३१ मताने विजयी झाल्याचे उपसरपंच मंगेश मसके यांनी जाहीर केले.
सरपंच अजय आकेरकर, जि प सदस्य गंगाराम सडवेलकर, मिलिंद परब, शशांक पिंगुळकर, विठ्ठल सिंगनाथ, निलेश प्रभू, पोलीस पाटील सतीश माडये, बाबली पिंगुळकर, सागर रणसिंग, अरुण सावंत, जीवन गंगावणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. रणसिंग यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री रणसिंग हे दुसऱ्यांदा तंटामुक्ती समिती अध्यक्ष झाले आहेत.

You cannot copy content of this page