Headlines

वैभव राऊळ यांची कोकण आघाडी अध्यक्षपदी फेरनिवड…

वडगावशेरी विधानसभा लोहगाव-धानोरी मंडळात भाजपकडून पुन्हा विश्वास; कार्यकर्त्यांकडून अभिनंदन..

⚡सावंतवाडी ता.२६-: भारतीय जनता पार्टी वडगावशेरी विधानसभा लोहगाव-धानोरी मंडळाच्या कोकण आघाडी अध्यक्षपदी वैभव वसंत राऊळ यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते राऊळ यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी भाजप लोहगाव मंडळ अध्यक्ष संदीप मोजे, लोहगाव-धानोरी मंडळाचे सरचिटणीस नितीन बर्गे तसेच चंदननगर-वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष आशिष भाऊ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपने पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल वैभव राऊळ यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले. कोकणातील नागरिकांसह समाजातील विविध घटकांना अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी राऊळ नेहमीच पुढाकार घेतात. कोणत्याही वेळी नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

संघटन मजबूत करण्याची कार्यपद्धती, कार्यकर्त्यांशी असलेला स्नेह आणि कोकणवासीयांना मदतीचा आधार यामुळे राऊळ यांना पुण्यातील कोकणवासीयांमध्ये विशेष स्थान मिळाले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपविल्याने पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page