⚡देवगड ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा व देवगड व्यापारी महासंघाच्यावतीने विज ग्राहक मेळाव्याचे आयोजन
देवगड चा विज ग्राहक मेळावा हा दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय जामसंडे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व देवगड व्यापारी महासंघाने हा मेळावा घेणेसाठी महावितरण कंपनीला राजी केलं आहे. यासाठी सर्व वीज ग्राहक सर्व व्यापारी बंधू ,प्रत्येकाने व्यक्तीने २४ तारखेच्या या विज ग्राहकांच्या मेळाव्याला प्रत्यक्ष हजर राहून आपल्या भावना,सुचना,सल्ले मांडण्यासाठी उपस्थित रहावयाचे आहे.
सततच्या खंडीत विज पुरवठ्या संबंधीची,चुकिच्या आणि भरमसाठ लाईट बिला संबंधीची,बंद स्ट्रीट लाईट संबंधीची,सडलेल्या-उन संबंधीची,लोंबत्या असुरक्षित तारां संबंधीची,कमी-जास्त दाबाच्या विज पुरवठ्या संबंधीची,बंद विज मिटर संबंधीची,तोडलेल्या विज कनेक्शन संबंधीची आणि अशा विज वितरणा संधीच्या आपल्या प्रत्येक तक्रारीची दाद मागून आमने सामने निकाल लावून घेण्याची अशी सुवर्णसंधी पुन्हा प्राप्त होणार नाही. याची नोंद घेवून सदर मेळाव्याला विज ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आले
