⚡कणकवली ता.१३-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर आज सोमवार १४रोजी करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
याठिकाणी जिल्ह्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १४,१७,१९वर्षाखालील मुला मुलींचे नोंदणीकृत संघ सहभागी होणार आहेत.
तरी सहभागी संघांनी आपल्या आॉनलाईन प्रवेशिकेसह स.9 वा.पुर्वी कासार्डे माध्यमिक विद्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा अधिकारी मनिषा पाटील यांनी केले आहे.
कासार्डेत उदया शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन
